Thursday, 14 March 2013

जयपूरच्या 'एनजीओ'तून 27 मुलींची सुटका

                 जयपूरच्या 'एनजीओ'तून 27 मुलींची सुटका 



jaipur
WD
मणिपूर आणि नागालॅंडमधून जयपूरमध्ये आणलेल्या 27 मुलींची मंगळवारी रात्री पोलिसांनी सुटका केली. या सर्व मुलींचे वय सहा ते 22 दरम्यान आहे. हे येथे 'चाइल्ड होम' नाव असलेल्या बनावट स्वयंसेवी संस्था (एनजीओ) चालवत होते. या एनजीओचे सर्व कामकाज जेकब जॉन या व्यक्तीच्या आदेशानुसार चालते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीतील एका एनजीओच्या मदतीने ही कारवाई करण्यात आली आहे. छापा मारण्यात आल्यानंतर याठिकाणी असलेल्या 27 मुली आणि दोन मुलांची सुटका करण्यात आली. जयपूरमधील मानसरोवर भागात ही एनजीओ चालविण्यात येत होती. या मुलांना सध्या शासकीय वसतिगृहात ठेवण्यात आले आहे. या एनजीओची कागदपत्रे बनावट असून, आणखी तपास करण्यात येत आहे. 




Read agriculture ( Please Add Skeep ) .............

No comments:

Post a Comment